वैशिष्ट्यीकृत पोस्ट

                      प्रेम कोणावर करावं?💞                  या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं! प्रेम हे अंतर्मनातून, हृदयातून हो...

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

                      प्रेम कोणावर करावं?💞
         
       या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं!

प्रेम हे अंतर्मनातून, हृदयातून होते असे म्हणतात. पण कोणावर आणी का होते? 14 फेब्रुवारीला जे तरूण तरूणी पाश्चिमात्य लोकांचा सण (Valentine Day) साजरा करतात ते प्रेम फक्त तरूण तरूणी पुरतंच मर्यादित का? ते पण एकादिवसापुरतंच!
     प्रेम हे आपल्या आई वडिलांवर, बहिण भावंडात, मुक्या जनांवरात होत नाही का? देवाने निर्माण केलेल्या सप्तरंगी निसर्गावर,धबधबे, डोंगरमाथा, उंच कडा, दर्‍यावर. महापुरूषांनी बनवलेले गड किल्ले...💓
  आई आपल्या पोटात 9 महीने अनोळख्या जीवाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. असंख्य वेदना होवूनही तुम्हाला या जगात आणते. तुम्हाला सांभाळून जगासमोर आदर्श व्यक्ती बनवते. वडील तुमच्या स्वप्नासाठी स्वतःच्या स्वप्नाचा विचार नकरता तुम्हाला काही कमी पडू देत नाहीत. वडील रागवतात आपली मुलं बिघडू नयेत म्हणून.  त्या रागा मध्ये लपलेले असते वडिलांचे प्रेम 💖
    बहिण भावांची एकमेकांबरोबर होणारी भांडणे, रूसवे फुगवे, मुद्दामहून खोड्या काढणे, एकमेकांची पाठराखण करणे यातच दडलेले असते प्रेम. 💞
   आपल्या कुटुंबाची सदस्य बनलेले कुत्रा, मांजरासारखे मुके प्राणी ( उंदीर, झुरळ....) यांना बोलता येत नसूनही ते व्यक्त करणारे. घरी आल्यावर आपल्या भोवती घुटमळणारे. मुके प्रेम 💕
   देवावर असलेली अगाढ श्रध्दा. प्रत्यक्षात देवाला न पाहताही देव आहे असे मानणारी व्यक्ती देवावरचे प्रेम दर्शविते. 🙏
  देवानेच निर्माण केलेल्या सप्तरंगी निसर्गाचा चमत्कार म्हणजे प्रेमाचा रंगीबेरंगी आविष्कार. निसर्गाने जे तुम्हाला भरभरून दिलंय त्याला जपा. हेच आपल्याकडून निसर्गावरील प्रेमाची परतफेड.🌈
   गड किल्ल्यावर तुमची नावं न लिहता ते साफसफाई करून स्वच्छ करा. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुंदर चेहऱ्यावर खरचटलं तर ते कसं दिसेल...
  आजकालची तरूण तरूणी करतात ते खरं प्रेम आहे का? हातात हात घालून फिरणे, आलिंगन करणे, चुंबन घेणे, महागडी गिफ्ट देणे.....झालं एकमेकांवर प्रेम!
    एकमेकांबद्दल कोणताही बडेजाव न करता, एकमेकांना सांभाळून, स्वतःच्या चुका सुधारून एकमेकांचा आदर करणे प्रेमाची पहिली पायरी.
   इथे प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे. 😍 पण ते कधीही जबरदस्तीने ओरबाडून मिळवायचे नसते. प्रेम हे दुसरयांवर निःसंकोचपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता होते ते खरं प्रेम. 🤗 मग त्याला नक्कीच प्रेमाने आलिंगन करा. 💘 डोळे बंद करून अनुभवा. 😎
   जेव्हा कोणी व्यक्ती कोणत्याही कारणाने दुर जाते तेव्हा जी ओढ निर्माण होते ते खरं प्रेम 💝
  असो यावेळी तुमचं खरं प्रेम कोणावर आहे ते नक्कीच कळवा. लोभ असावा, प्रेम असावे.
   प्रेम आंधळे असते असे बोलतात. पण कधीही प्रेम आंधळेपणाने करू नये...🙈🙉🙊
सर्वाना प्रेम दिवसाच्या एका दिवसापुरतं नाही तर जन्मो जन्मीभर शुभेच्छा.