वैशिष्ट्यीकृत पोस्ट

                      प्रेम कोणावर करावं?💞                  या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं! प्रेम हे अंतर्मनातून, हृदयातून हो...

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

प्रजासत्ताक दिन आणी राष्ट्रवाद 🇮🇳

         हेची आमुचे भाग्य आम्ही भारतात जन्मलो,
         विसरूनी जात धर्म पंत भारतीय झालो.....
अहो ऐकलंत का! उठा. झेंडावंदनला जाताय ना.
राहु दे ग! एक दिवस तरी झोपु दे. (इतर दिवशी झोपतच नाहीत)
बेटा! चल ऊठ. झेंडावंदनला जाऊया.
आई, प्रजासत्ताक दिन का साजरा करतात?
         ऐ मेरे वतन के लोगो जरा आखो में भरलो पानी
       जो शहिद हुए हैं ऊनकी जरा याद करो कुर्बानी.....
अनेक वर्षांच्या संघर्षांची, हुतात्म्यांच्या प्राणांची आहूती देऊन भारत 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. 1949 साली संविधान लोकसभेत पास झाले. नंतर 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अमलात आली. भारत लोकशाही मानणारा प्रजासत्ताक देश बनला.
    कुणी ना बालक कुणी ना सेवक जनता इथे राज्य करी
    अदिती प्यारे हरिजन सारे समतेच्या मंदिरी....
यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. त्या देशाचा कारभार चालविण्यास राजनेत्याची निवड जनता (18 वर्षावरील) जनता करते. म्हणजे भारतात कोणतीही राजेशाही नसून लोकशाही आहे.( स्वप्नात)
भारतीय जनता हा दिवस राष्ट्रीय सण ( 26 जानेवारी, 15 ऑगस्ट) झोपून साजरा करतात.🙏
याच दिवशी दिल्लीला जनपथ येथे भारतीय फौजा(नौदल,पायदल,वायुसेना) यांचे अद्ययावत शस्त्रासह संचालन होतै. प्रत्येक राज्ये आपली
संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शीत करतात.(सरकारी चॅनेल दूरदर्शनवर प्रदर्शन दाखवतात)
प्रमुख पाहूणे म्हणून परदेशी पाहूणे आयात करतात.
        अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे
        ध्वज विजयाचा उंच धरा रे.....
भारत देशाचा तिरंगा फडकावून त्यास अभिवादन केले जाते. छातीवर तिरंगा लावून ताठ मानेने फिरतात. दुसर्‍या दिवशी हेच तिरंगे रस्त्यावर पडलेले असतात. तिरंग्याची शान एका दिवसापुरती!😢
राष्ट्रगीत गायले जाते, ते पण दोन  (26 जानेवारी, 15 ऑगस्ट) दिवसापुरते.(राष्ट्रगीत माहीत असेल अशी आशा करतो.)इतर दिवशी वाजवले तर असे आपल्याकडे बघतात की आपण पाकिस्तानात आहोत का असं वाटू लागते!😊
24 जानेवारी 1950ला अधिकृत राष्ट्रगीत म्हणून 'जन गन मन' मान्यता मिळाली.


        सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवावे की नाही, राष्ट्रगीतावेळी उभे रहावे की नाही यावरून वाद होतायत हीच का लोकशाही! इथे धर्म महत्वाचा वाटतो. पण ज्या देशात आपण राहतो,खातो त्या देशाच्या सन्मान बद्दल तरी हे टाळावे. नाहीतर तो देश सोडावा. पाकिस्तानात जावे....
     जिस थाली में खाते है उसमें ही छेद करते है....👊
आपल्या भारतीय राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत. पहिला गडद भगवा रंग,हा शौर्याचा प्रतीक आहे. दुसरा पांढरा रंग सत्य,शांतीचा संदेश देतो. तिसरा हिरवा रंग समृध्दीकडे वाटचाल दर्शवितो. मधल्या पांढऱ्या रंगात निळ्या रंगाचे 24 आरे असलेले अशोकचक्र आहे. पण तरीही प्रत्येकजण आपल्या धर्माचे स्वतंत्र रंगाचे झेंडे घेऊन मिरवतात. कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा.. शांतीचा संदेश देणाऱ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा कोणी फडकवत नाही ही शोकांतिका.
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त प्रतिज्ञा संपेपर्यंतच...🤔
          माणुसकीच्या शत्रुसंगे युध्द आमुचे सुरू
          जिंकू किंवा मरू...मरू...मरू
          जिंकणार कधीच नाही....🙏
प्रत्येकाने आपल्या महापुरूषांचे विचार स्वतः अमलात आणा. दुसरयांवर लादू नका आणी आपलेच महापुरुष किती श्रेष्ठ आहेत हे दाखवू नका. हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
तुम्हाला काय पाहीजे त्याचा विचार करा.
         हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषीतांचे(दंगलखोराचे)
         आचंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे(महापुरुषांचे)
         कर्तव्य दक्ष भुमी सीता रघुत्तमाची(रावणाची)
        रामायणे घडावी येथे पराक्रमाची...(जाती पातीची)
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य जपून जनतेने आपापसातील एकता कायम राखणे. ही भुमिका प्रत्येक भारतीयाने स्वतःहून अमलात आणणे गरजेचे आहे.तरच विकास होईल तुमचा आणी राष्ट्राचा.
प्रत्येकजण मी व माझा धर्म याभोवतीच फिरतो. देशाबद्दल व देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुरविरांची आठवण फक्त दोन दिवस काढून काय उपयोग! त्यांनीही फक्त धर्माचाच विचार केला असता तर आपण स्वतंत्र झालो असतो का? सुरवात तर करा...
     नाहीतरी सरकारने 1984 साली झालेल्या शीख दंगली प्रकरणाची परत चौकशी करण्याचं ठरवलंय.दंगल केलेलेही मेले असतील आणी वरून हसत असतील. करोडो पैशांचा चुराडा होईल. हाती येईल धुपाटणं. जुने मुडदे खोदून काही उपयोग नाही. जे जिवंत आहेत त्यांचे परत मुडदे पडतील. विचार करा..🙈🙉🙊
          उत्सव तीन रंगाचा असला तरी ते तीन रंग एकत्र राहीले तरच त्यात मजा आहे. त्यातच एकजुटीचा विजय आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाचा अभिमान बाळगा.
#HappyRepublicDay🇮🇳
बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो...!🇮🇳



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा