नविन वर्ष आशेचा किरण घेऊन येते असे म्हणतात पण भारतात जुन्याच आशेवर जगत असतात. काल संध्याकाळपासून सोशलमिडीयावर फिरत असलेला 200 वर्षां पूर्वीचा इतिहास वाचण्यात रात्र झाली.
खरोखरच आतापर्यंत कधीही न ऐकलेला,न वाचलेला इतिहास माहिती झाला. आपसूकच भीमा-कोरेगावला प्रसिद्धी मिळाली.सलाम त्या इतिहासकरांना🙏
गौतम बुद्ध जगाला शांतीचा संदेश देत. त्यांचाच बौद्ध धर्म स्वीकारणारेही शांतता ठेवू शकले नाही. मग इतरांकडून काय अपेक्षा करणार. त्यात त्यांची चुक नाही. #राजकारण
दगडफेकीवरून सुरू झालेले तोडफोडीपासून जाळपोळीपर्यत पोचले. त्यात नुकसान झालेले आपलेच बांधव(जातीचे) असू शकतात याची त्यांना कल्पना नसावी.
खरोखरच! हा इतिहासाचा आपल्याला जगण्यास, पोट भरण्यास उपयोग होतो का? माझ्या मते हा विषय प्राथमिक शिक्षण 7 वी पर्यंतच समावेश असावा. पुढे विद्यार्थ्यांची कोणत्या विषयात रूची आहे ते शोधून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावा. ज्याचा पुढील आयुष्यात उपयोग होईल.
जोवर इतिहासवर जग चालेल तो पर्यंत प्रत्येकजण आपला इतिहास सांगून आपण किती श्रेष्ठ आहोत इतरांपेक्षा यातच जग संपेल.
इंग्रजही इंग्लंड मध्ये बसून आपल्यावर हसत राहतील. आपल्यालाही हे हसु हवं असेल तर जातीयवाद संपवावा लागेल नाहीतर आपणच संपवू स्वतःला आपल्याच हातून.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटतं असेल? 🤔
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटतं असेल? 🤔
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा